Sunday, February 28, 2010

मी फसलो म्हणूनी

मी फसलो म्हणूनी हसू दे वा चिडवू दे कोणी
ती वेळच होती वेडी अन् नितांत लोभसवाणी

ती उन्हे रेशमी होती, चांदणे धगीचे होते
कवितेच्या शेतामधले ते दिवस सुगीचे होते
संकेतस्थळांचे सूर त्या लालस ओठी होते
ती वेळ पूरीया होती, अन् झाड मारवा होते!

आरोहा बिलगायाचा तो धीट खुळा अवरोह
भरभरून यायचे तेव्हा त्या कृष्णनयनीचे डोह
डोहात तळाशी खोल वर्तमान विरघळलेले
अन् शब्दांच्या गाली पाणी थोडेसे ओघळलेले!

ती हार असो वा जीत, मज कुठले अप्रूप नाही
त्या गंधित गोष्टीमधला क्षण कुठला विद्रूप नाही!
ती लाल केशरी संध्या निघताना अडखळलेली
ती निघून जातानाही, बघ ओंजळ होती ओली!

स्वर- सलील कुलकर्णी,संदीप खरे
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- दमलेल्या बाबाची कहाणी

जाब तुला रे कुणी पुसावा..?

अगतिक झालो,निष्पभ झालो…तरीही केला तुझाच धावा
रोखठोक मज आज बोलू दे…माणूसकीने ऐका देवा !
जाब तुला रे कुणी पुसावा…?

कुठे ओतशी हिमराशी अन् कुठे वणांचे गच्च तुरे
कुठे कोरडे वाळवंट अन् कुठे बनविशी सरोवरे
कुठे उभवीशी गिरिकंदरे…कुठे सपाटी मैलोमैल
किते पृथ्वी ही तहानलेली…कुठे घडे तीज सचैल स्नान
नक्षत्रांचे सडे सांडशी…कोटी कोटी हे ग्रह तारे
कुठे कुणाशी धडका घ्याया धुमकेतू हे फिरणारे
कुठे अचलसा ध्रुव कुठे हे तारे चमचम गळणारे
कुठे भयानक कृष्ण विवर हे काळालाही गिळणारे
निर्वाताच्या पोकळीतुनी कशास रचसी नाटक हे?
स्वत:च सारे अभिनेते आणि स्वत:च नाटक बघणारे
लाख सूर्य हे,लाखो पृथ्व्या,लाखो चंद्र विखुरलेले
ज्ञान थेंब भर,अज्ञानाचे सागर लाख पसरलेले
ब्रह्मांडीही मावत नाही,ह्रुदयी माझ्या कसा वसावा?

पंडित कुणी, कुणी धूरंधर,कुणी देखणे,कुणी महान
कुणी अडाणी,कुरूप कोणी,कुणा न जगण्याचेही भान
लेंढाराने त्रस्त कुणी अन् कुणी निपुत्रिक झुरणारे
कुणी उपाशी,कुठे अन्न हे व्यर्थ मातीला मिळणारे
फुलून येण्याआधी खुडशी जन्म कधी तू क्रूरपणे
मरण येईना म्हणून रडती कोणी कोठे दीनपणे
कुठे पूल परक्यातून जुळतो…कुठे आपुल्यातून दरी,
कुणी बनवते विश्वाला घर,कुणी परके आपुल्याच घरी
सुरवंटातून कधी सुरंगी फुलपाखरे उमलविशी
कोठे राजस कमळ फुलवूनि भवताली चिखल रचशी
जलथेंबांचे करशी मोती,मोत्यांची माती करशी ,
ज्याची त्याची मापे सारी काय हिशेबाने भरशी?
कुणास देशी राज्य पृथ्वीचे, कुणा कटोरा तू देशी
जे देशी ते का देशी अन् जे घेशी ते का घेशी?
कसे तुझे हे गणित कळावे कशा तुझ्या या स्वैर तर्‍हा ?
मातीत एका जन्म तरीही कुणी कोळसा कुणी हिरा…!
श्रद्धेच्या थेंबांनी कैसा हृदयामधला विझेल वणवा….?

स्वर- सलील कुलकर्णी,संदीप खरे
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- दमलेल्या बाबाची कहाणी

इक्कड राजा इक्कड बाजा

म्हणा…
अ…अ..आ..आ
अ…आ…ई…ई..उ..ऊ…ए…आए…ओ…ओ…अं…अः…
इक्कड राजा इक्कड बाजा
सगळा नुसता गाजावाजा
अ..अ..अननस...आ..आ..आई
वरतुन खाली…खालून खाली…
घसरत घसरत आत्या आली…
याचे पोट त्याचे पोट
"
क ला काना…का..
ख ला काना…खा
क..क..कमळातला...कमळातला..कमळातला
आला आला आला आला
साहेब झाला साहेब झाला
हाजी हाजी झुकवा मला
सलाम ठोका थुंकी झेला
मास्टर करून राहीले गणती
सगळी नुसती खोगीरभरती
त्यांच्या नावे होते पाटी
राही त्यांच्या अडड्या वरती
केंद्रोकेंद्री बढती धाडी
सगळी गाढवे बनली घोडी
साक्षरतेची धो धो करता
निरक्षरांची तरते होडी
बबन नमन कर
छगन भजन कर



सजली सोंगे सजली ढोंगे
पाटयांवरती पाढे कोष्ट
सुजाण सारे अजान होऊन
सुजानतेचे करती नाटक
जुनी टाकुनी अवघी ओळख
नवीन नावे नवीन गावे
खोटी नावे खरे तोतये
खोट्यासाठी खरे लिहावे
अशी साधना अशी तपस्या
सरस्वती ही गदगदली
अभियानाची खरूज अवघ्या
" नि खाजवली

बे एके बे…बे दूणे चार…
बे त्रिक सहा..बे चोक…?बे चोक…?बे चोक…?

नको कारणे ना गारहाणे
"
मतलब केवळ आदेशाची
"
आदेशाचे गुलाम असले
घुमे पिपाणी विजयाची
साक्षरते वर उठे निशाणी
एका डाव्या अंगठ्याची

स्वर- सलील कुलकर्णी, अंजली कुलकर्णी,संदीप खरे
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- दमलेल्या बाबाची कहाणी/निशाणी डावा अंगठा

देते कोण...?

चिमुकल्या चोचीमध्ये आभाळांचे गाणे…
मातीतल्या कणसाला मोतियांचे दाणे...
उगवत्या उन्हाला ह्या सोनसळी अंग...
पश्चिमेच्या कागदाला केशरिया रंग...
देते कोण..देते कोण.. देते कोण देते ??
रुम... रुम ता रा रा... रुम रुम...ता रा रा.... रुम रुम ता रा रा... रुम तारा...

सुर्यासाठी उषा आणि चंद्रासाठी निशा...
घरी परतण्यासाठी पाखरांना दिशा.... (देते कोण... देते कोण....)
मध खाते माशी तरी सोंडेमध्ये डंख...
चिकटला कोळी त्याच्या पायाखाली डिंक...
देते कोण.. देते कोण.. देते कोण देते??

नागोबाच्या फण्यावर दहाचा आकडा...
खेकड्याच्या प्रवासाचा नकाशा वाकडा...(देते कोण... देते कोण.... )
कोळंब्याला चीक आणि अळूला ह्या खाज...
कोणी नाही बघे तरी लाजाळुला लाज...
देते कोण.. देते कोण.. देते कोण देते??

मुठभर जीव..आणि हातभर तान...
कोकिळेला गुरू नाही तरी गाई गान... (देते कोण... देते कोण.... )
काजव्याच्या पोटातून जळे गार दिवा...
पावसाच्या अगोदर ओली होते हवा...
देते कोण.. देते कोण.. देते कोण देते??

भिजे माती आणि उरे अत्तर हवेत...
छोट्या छोट्या बियांतून लपे सारी शेतं...
नाजुकश्या गुलाबाच्या भोवतीने काटे...
सरळश्या खोडावर फुटे दहा फाटे..
देते कोण.. देते कोण.. देते कोण देते??

आभाळीच्या चंद्रामुळे लाट होते खुळी...
पाण्या नाही रंग तरी नदी होते निळी...
भुईतून येतो तरी नितळ हा झरा...
चिखलात उगवतो तांदुळ पांढरा...
देते कोण.. देते कोण.. देते कोण देते??

स्वर- सलील कुलकर्णी, श्रेया घोशाल
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- दमलेल्या बाबाची कहाणी/आनंदी आनंद

देही वणवा पिसाटला

वणवा…
चंद्राने टाकलिया ठिणगी
अंगाची अंगाशी सलगी
वेडापिसा वारा कसा
बेभान होऊन फिरला
देही वणवा पिसाटला

चांदण उरात
रात ही भरात
सोडून मोकळे केस
धोक्याच ठिकाण
आलया तुफान
मोडून लाजेची वेस
भरतीची वेळ…मांडून खेळ
चांदवा उधाणला

चंद्राच्या सिल्वरचे हातात बिलवर
तार्‍याच्या डायमंडचा झुमका
सॅण्डलच्या कडीगत कमरेला चैन
करी बेचैन मादकसा ठुमका
गोर्‍या या गाली देतो
माज थोडी लाली
माझी व्हीनसच्या शाईनची काया
आणली तुझ्यापाशी कंप्लीट ही गॅलक्सी
टाइम नको दवडू वाया
वागू नको फ्लॉप घेऊ चंद्रावर स्टॉप
अधांतरी जीव शिणला

स्वर- सुनिधी चौहान
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- दमलेल्या बाबाची कहाणी/ हाय काय नाय काय

दमलेल्या बाबाची कहाणी

कोमेजून निजलेली एक परी राणी
उतरले तोंड,डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजेतच तरी पण येशील खुशीत
सांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची या कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....

आटपाट नगरात गर्दी होती भारी
घामाघूम राजा तरी लोकलची वारी
रोज सकाळीच राजा निघताना बोले
गोष्ट सांगायाचे काल राहूनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी
आज परि येणार मी वेळेतच घरी
स्वप्नातल्या गावामध्ये मारू बघ फेरी
खर्‍याखुर्‍या परीसाठी गोष्टीतली परी
बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बाबाची या कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....

ऑफिसात उशीरा मी असतो बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास-तास जातो खाल मानेने निघून
एक-एक दिवा जातो हळूच विझून
अशा वेळी काय सांगू काय-काय वाटे
आठवासोबत पाणी डोळ्यांतून दाटे
वाटते की उठूनिया तुझ्या पास यावे
तुझ्यासाठी मी पुन्हा लहानगे व्हावे
उगाचच रूसावे नि भांडावे तुझ्याशी
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी

उधळत खिदळत बोलशील काही
बघताना भान मला उरणार नाही
हसूनिया उगाचच ओरडेल काही
दुरूनच आपल्याला बघणारी आई
तरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असा
क्षणा-क्षणावर ठेवू खोडकर ठसा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची या कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....

दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई
मऊ-मऊ दूध भात भरवेल आई
गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी
सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी

कुशी माझी सांगताहे ऐक बाळा काही
सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही
जेवू,खाऊ,न्हाऊ,माखू घालतो ना तुला
आईपरी वेणी-फणी करतो ना तुला
तुझ्यासाठी आईपरी बाबासुद्धा खुळा
तोही कधी गुपचूप रडतो रे बाळा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची या कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....

बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं
दूरचं पहात राहिलो फक्‍त,जवळ पहायचंच राहिलं

असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशीरानं येतो
एका घरा राहुनिया मनामध्ये घोर,
तुला तुझा बाबा नाही मला माझी पोर
बालपण गेले तुझे-तुझे निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं?
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं?
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....

स्वर- सलील कुलकर्णी,संदीप खरे
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- दमलेल्या बाबाची कहाणी

चाललंय काय?

कुणी बी उठतंय...काही बी बोलतंय
कस भी वागतंय...चाललंय काय?
अरे कमरेच काढतंय…डोक्याला बांधतंय
आणि वर हसतंय…चाललंय काय?
''
''
आभाळाचं भांडं….पावसाळ्यात सुकतंय
हिवाळ्यात गळतंय…चाललंय काय?
काय राव नुसतंच बघताय?

आई नि बाप नाही दोघांची गाठ
पोर बघतोया वाट
भावाला भाऊ तरी पाठीला पाठ
लावी जन्माला नाट
चंद्रावानी पोर झाली डोक्याला ताप
उभ्या जन्माचा शाप आता चाललंय काय?
विकलिया आई नि विकलाय बाप
पोट याला सांभाळता चाललंय काय?
काय राव नुसतंच बघताय?

हे राजाने काढलीया विकायला प्रजा
आता सगळीच मजा…चाललंय काय?
मातीतल्या माणसाची झालीया माती
ना कुणाची भीती…चाललंय काय?
आला सोन्याचा धूर…आल्या पैशाच्या गप्पा
आला बाजारात बाप्पा..चाललंय काय?
देवान मारलीया कवाच टांग
तरी दर्शनाला रांग…चाललंय काय?
आर..कुणी ऐकल अस काय बोलताय?
खर सांगतोय…देवा शप्पथ

माणसाचं कारट…कसं लाळ गाळतंय
माग माग मागतंय…चाललंय काय?
फुटतीया छाती…नि तुटलेली नाती
नि तरी सुद्धा धावतय…चाललंय काय?
थांबायला वेळ नाही…बसायला वेळ नाही
बोलायला वेळ नाही…चाललंय काय?
अन्नाला चव नाही…पाणी बी गोड नाही
कशाची ओढ नाही…चाललंय काय?
काय राव नुसतंच बघताय?

स्वर- सलील कुलकर्णी,संदीप खरे
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- दमलेल्या बाबाची कहाणी

बंध मनाचे जुळलेले

बंध मनाचे जुळलेले
रंग नभाचे आणि मनाचे
अलगद उतरून आलेले

श्रांत जीवाला झुळुक जशी
स्पर्श तसे हे मोरपिशी
क्षणात एका मनात माझ्या
लक्ष पिसारे फुललेले

शब्द दाटतो उरी जरी
ओठावरती मौन जरी
परस्परांचे अवघे काही
परस्परांना कळलेले

क्षण सरताना चपल गती
भान बावरे कुजबुजती
आज आपुले ठसे मनावर
अमर होऊनी उरलेले

स्वर- सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- दमलेल्या बाबाची कहाणी

Tuesday, February 23, 2010

याला कर फोन

करु वाटे खरे तर तुला एक फोन
यावा वाटे खरे तर तुझा एक फोन
असे काही होत नाही मग उगाचच
याला कर फोन कधी त्याला कर फोन

फोन तुझा सदा चालू कधी बंद नाही
आणि त्याला तारेचाही आता बंध नाही
पक्षापरी निरोपांची हवेतून ये-जा
हातातून तो ही परी झेपावत नाही
हातामध्ये फोन तरी प्रश्न एवढाच
बोलायचे काय आणि बोलणार कोण

कसा बघ फोन माझा गावोगाव फ़िरे
हातातल्या हातामध्ये एकटाच झुरे
ह्रदयात साठवल्या काही जुन्या खुणा
टाकवेना फोन माझा जरी झाला जुना
पुन्हा पुन्हा करतो मी बटणाशी चाळा
पुन्हा पुन्हा बदलतो रींगरचा टोन

खिडकीत साधुनिया सिग्नलचा कोन
कसे कसे किती किती बोलायचा फोन
आता कसा उगामुगा वरवर बोले
जिभेवर जसे काही त्याच्या वारे गेले
गोड गोड बोलायला एकटा मी पुरे
भांडायला तरी सखे लागतात ना दोन

स्वर- संदीप खरे
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- ढिपाडी ढिपांग

सखे कसे सांग तुला

सखे कसे सांग तुला अगदीच नाही भय?
आडवेळ, आडवाट, आडरान, आडवय!

रोज नवा ऋतू येतो देही तुझ्या वसतीला
आला आला म्हणताना बहर तो झाला जुना
क्षण उन्ह, क्षण छाया, क्षणी सारे जलमय

तिमीरचे नाही भय, नाही अडवत नदी
काट्यावर पडे पाय जशी काही फूलघडी
मोरपंखी रानातली उचलून नेते सय

तुझ्या मनातून फिरे एक सोनसळी रात
आणि तुला वाटते की चांदण्याने व्हावा घात
वादळाला देते साथ उरातली कारी लय

आणि जेव्हा जेव्हा होते तुझी साजनाशी भेट
चांदण्याचा देह तुझा जरी घेऊ बघे पेट
नको नको म्हणे तुझा लाजण्याचा अभिनय

स्वर- सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- ढिपाडी ढिपांग

ढिपाडी ढिपांग

ढिपाडी ढिपांग ढिचीबाडी ढिपांग
ढिपाडी ढिपांग ढिचीबाडी ढिपांग

काळी माती निळं पाणी हिरवं शिवार
ताज्या ताज्या माळव्याचा भुईला या भार
ज्वानीच्या या मळ्यामंदी पिरतिचं पानी
बघायाला कवतिक आलं नाही कोनी
मळ्याला या मळेवाली भेटलीच नाय
अन् रानी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय?

काकडीचा बांधा तुझा, मिरचीचा तोरा
मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा
तुझा मिर्चीचा तोरा, तुझा रंग गोरा गोरा
तुझा मिर्चीचा तोरा, तुझा रंग गोरा गोरा

लिंबावनी कांती तुझी, बीटावानी ओठ
टमाट्याचे गाल तुझे, भेंडिवानी बोट
काळजात मंडई तू मांडशील का?

नको दावू भाजीवाल्या फ़ुकाचा रुबाब
भाजी तुझी वर ताजी, आतून खराब!
गोड गोड बोलशील..पडशील फ़शी
भाजी तुझी पाटीमंदी घेऊ तरी कशी?
आजकाल कुनाचाबी भरवसा नाय

तुझ्यासाठी शिवाराची केली मशागत
खुरपलं जीव, दिलं काळजाचं खत
राखायाला मळा केली डोळ्याचीया वाट
बुजगावण्याच्या परी उभा दिनरात

नको जळू दिनरात, नको जीव टांगू
ठाव हाय मला सारं नको काही सांगू
पिरतीत राजा तुझ्या नाही काही खोड
तुझ्या हाती मिरचीबी लागतीया गोड
माझ्या संग मळा तुझा कसशील काय

स्वर- सलील कुलकर्णी, अंजली कुलकर्णी,अवधूत गुप्ते, वैशाली सामंत
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- ढिपाडी ढिपांग/तुला शिकवीन चांगलाच धडा

प्रेमात म्हणे

प्रेमात म्हणे कुणी हुरहुरते कुणी मोहरते राणी
प्रेमात म्हणे कुणी अडखळते बघ धडपडते कोणी

प्रेमात म्हणे मौनात बुडे, ना सुटे घडी ओठांची
प्रेमात म्हणे शब्दास भूल, जगन्यास झुल कवितेची
प्रेमात म्हणे जो गड़बड़तो तो बडबडतो गाणी

प्रेमात म्हणे हातात हात, होतात घात जन्माचे
प्रेमात म्हणे मिटतात श्वास, फिटतात पाश मरणाचे
प्रेमात म्हणे आरंभ गोड अन अंतापास विराणी

मज ठाव नसे हे प्रेम कसे पण ऐक तुज्याविन आता
क्षण एक दूर जाताच पुर डोळ्यात दाटती माज्या
जो बुडालेला तो तरलेला, तरला तो बुडला, राणी

स्वर- सलील कुलकर्णी,विभावरी आपटे-जोशी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- ढिपाडी ढिपांग

क्षणात लपून जाशी

क्षणात लपून जाशी क्षणात दिसून
जसे काही श्रावणाचे सोनसळी उन्ह

किती आलो दूर दूर तरीही अजून
वार्‍यावर वाहताहे तुझी तुझी धुन
पळतात ढग तुझा सांगावा घेऊन

शोधाया निघालो राणी असे एक गाव
पात्यापात्यावर जिथे दिसे तुझे नाव
जिथे तुझा गंध करी फुलांना तरुण

जाणवती आसपास कसे तुझे भास
वाटे आता थांबणार अवघा प्रवास
मनातली स्वप्ने सारी येतील रुजून

स्वर- सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- ढिपाडी ढिपांग

हे गंधित वारे

हे गंधित वारे फिरणारे
घन झरझर उत्कट झरणारे
जरी परिचित सारे पूर्वीचे
तरी आता त्याही पलिकडचे
बघ मनात काही गजबजते
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे

कुठल्या देशी नकळत माझे पाऊल पडले रे
सूर रोजचे कसे नव्याने मनास भिडले रे
हे गीत जयाला पंखसुध्दा
अन हवाहवासा डंखसुध्दा
कधि शंकित अन नि:शंकसुध्दा

मनात जे जे दडून होते नकळत आकळते
कसे दुज्याच्या स्पर्शाने हे 'मीपण' झगमगते
ही जाणीव अवघी जरतारी
हर श्वासातुन परिमळणारी
हर गात्रातुन तगमगणारी

नाव न उरले, गाव न उरले, अवघे ओसरले
बेभानाचे भान जिण्याला बिलगुन बसलेले
हा स्पर्श विजेच्या तारांचा
हा उत्सव बघ अस्वस्थाचा
हा जीव न उरला मोलाचा

स्वर- सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- ढिपाडी ढिपांग

बरं नव्हं

मला न ठाव काय मनात डाव
अस उगाच हसून पाह्यचं
झुरून झुरून तरी दुरून दुरून
असं खुशाल निघून जायचं
बरं नव्हं काय खर नव्हं

असा गोंडा घोळून मागं मागं फिरून
माझी करशील बदनामी कारट्या
तुझ्या मनात चोर माझ्या घरासमोर
कसा सतरांदा घालतोस घिरट्या
बरं नव्हं काय खर नव्हं

पाय ओढाळ ग मन खट्याळ ग
कसं पळत ते पळतच ना राणी
नाही चेहर्‍यावरी गोष्ट आहे खरी
पण कळत ते कळतच ना राणी
असं आतून उधाण आणि वरुन विराण
आणि मी नाही त्यातली म्हणायचं

नाही समजत मला घाई कसली तुला
जरा जनाची करावी काळजी
झाड वाढायला फळ लागायला
जरा टाइम तर द्यावा ना रावजी
भलत्या मस्तीमध्ये येता रंगामध्ये
वय लक्षात घ्या ना कळीच

माझं ऐकून घे थोडं समजून घे
काय मनामध्ये भलतं-सलतं
नाही लागत डोळा जीव झालाय खुळा
माझ्या उरात काही तरी हलत

मला समजत नाय अडे माझाही पाय
तुला बघून सुटताया भान
आड येतो पुन्हा माझा बाईपणा
माझ्या शब्दांना लाजेची आन
मनी रुसवा धरून गैरसमजा मधून
अस भलत्याने भलतंच व्हायचं

स्वर- सलील कुलकर्णी,वैशाली भैसने- माडे
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- ढिपाडी ढिपांग

Wednesday, February 17, 2010

तुझ्याविना सखया

सूर्य डोईवर जळणारा
चांद राती झगमगणारा
दिशा दिशा तरी कशा
उदास रे गमल्या
तुझ्याविना सखया
तुझ्याविना….

पश्चिम वेलीवरती फुलल्या रंग फुलांच्या माळा
पौर्णिमेतून पहा पसरल्या शीतल मोहक ज्वाळा
सार्‍यातून विरघळताना आत आत मोहरताना

भान हरपुनि पाय थबकले एका जागी आता
माझ्या पुढती धावत सुटल्या अदृश्यांच्या वाटा
वाटा हरवल्या हसणार्‍या जरी क्षितीजाशी पळणार्‍या

स्वर- बेला शेंडे
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- हृदयामधले गाणे

रुणझून रुणझून नादत

रुणझून रुणझून नादत पैंजण
पैल तटावर निळसर साजन ग
निजले गोकुळ मागे ठेऊन
चेहर्‍यावरती घूंघट घेऊन ग
चालले यमुनेकडे अंतर हे अधिरे
जळतसे छळतसे मज कसे कृष्णपिसे गहिरे

झर झर येऊन पदरा पकडून हसतो मज हा वारा
अडविती लाटा अवघ्या वाटा पाऊस कोसळणारा
कुणी अडवावे कुणास भ्यावे श्रीहरी सावरणारा
जायचे पोचायचे इतुके मज ठावे
हो जरी पळ भरी पण तरी मी त्याचे व्हावे

या तीरावर जरी अंगावर पाश मला छळणारे
त्या तीरावर दिसते लाघव निळसर मोहवणारे
एका स्पर्शी शत जन्मान्ची तहान शांतवणारे
एकदा येऊ दे कानी ती मुरली
खूण ही या तीरी लाजरी माझी ही उरली

स्वर- बेला शेंडे
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- हृदयामधले गाणे

राती अर्ध्या राती

राती अर्ध्या राती
असं सोडून जायाचं न्हाय
मोडूनी संग हा रंग हा
जायाचं न्हाय न्हाय न्हाय न्हाय

जरा हसावं लाजावं खुलावं रडावं
उगाच लटक रुसून
काही सांगावं,पुसावं,ऐकावं, मागावं
बाजूस तुमच्या बसून
या जीवा लागले नाद हे
सांगू काय काय काय काय

आली लाजत,नाचत,ठुमाकत,मुरडत
शुक्राची चांदणी
साज पिरतीचा साजत सजत शोभत
देहाच्या गोंदणी
घ्या बघून साजना मी उद्या
गावायची न्हाय न्हाय न्हाय न्हाय

स्वर- बेला शेंडे
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- हृदयामधले गाणे

निळ्या मनाचे निळे किनारे

निळ्या मनाचे निळे किनारे
निळ्या जळाची निळसर खळखळ
एकांताच्या निळ्या मिठीतून
निळ्या रात्रीचा निळाच दरवळ

वेळूच्या बेटातून शिरला
अन् भिरभिरला वारा निळसर
निळ्या हातीची निळसर मुरली
आणि तिच्यातून निळसर फुंकर
निळ्या स्वरांनी भुलावून गेले
काही निळसर चंचल अवखळ

कसे निळ्याचे निळसर गारुड
भूल कशी ही निळसर पडली
काया तर झालीच निळी पण
छाया देखील निळीच झाली
निळ्या पखाली निळी पाऊले
निळ्या चाहूली निळीच सळसळ

स्वर- बेला शेंडे
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- हृदयामधले गाणे

जंतर मंतर…

जंतर मंतर…
जंतर मंतर…
जंतर मंतर रातीनं चंद्राची बिंदली चोरून नेली
इपरीत खेळ जरी पुनवेची वेळ
काल रानात अमोशा झाली
पावलं वेंधळी झाली
वाट ही आंधळी झाली
इपरीत खेळ जरी पुनवेची वेळ
काल रानात अमोशा झाली

कडे कपारीत हलत्या डूलत्या
भीतीच्या पागोळ्या झाल्या
पायाखाली काही भलत्या सलत्या
सावल्या हालून गेल्या
मोहाचे फूल गेले घालून भूल
काल रानात अमोशा झाली

उराच्या आतून हुंकारते काही
कालवा कालवा झाला
उघड्या फन्याने फुत्कारते काही
गारवा जहरी झाला
दंशाची धार झाला बोभाटा फार
काल रानात अमोशा झाली

टाकुनिया घाला उतला मातला
खजिना लुटून नेला
जडावला जीव शिणला भागला
रावा ही उडून गेला
सरला उपाय सांगू कुणाला काय
काल रानात अमोशा झाली

स्वर- बेला शेंडे
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- हृदयामधले गाणे

हृदयामधले गाणे

हृदयामधले गाणे माझे
कधीच नव्हते असे अनावर
इतुकी नाजूक रिमझिम नव्हती
या आधी या स्वरास्वरावर

करून सारी बंद कवाडे
मी माझ्यातच रमले होते
वाटत होते कळले अवघे
परंतु काही कळले नव्हते
मना आतले आतुर काही
आज अचानक ये ओथावर

नकळे केव्हा कसे उमटले
चंद्र खुणांचे तसे साजीरे
आता आता हसन्यावरती
रंग पसरती जरा लाजरे
पडे अनामिक भूल मनावर
जसे चांदणे ये देहावर

स्वर- बेला शेंडे
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- हृदयामधले गाणे

दूर नभाच्या पल्याड

दूर नभाच्या पल्याड कोणी
दाटुन येता अवेळ पाणी
केवळ माझ्यासाठी रिमझिमते !
केव्हा केवळ भणाणणारा
पिसाटलेला पिऊन वारा
अनवाणी पायांनी वणवणते !
कुणी माझे, मजसाठी, माझ्याशी गुणगुणते
सा रे ग म प
प ध प ग म
म प म ग रेगरे
रे ग रे नी सा

कधी लपले अंकुर पालवती अन् उमलून येते माया
अन् दीप उजळता प्रकाशास त्या बिलगुन बसते छाया
हे उरात काही लपलेले जे आपुल्या नकळत जपलेले
ते गीत अचानक सुचलेले ओठी
स्वर मिळता लय जुळता
सर सर सर सरसरते

ही कुठली जवळीक दूर असून ही प्राणासोबत राही
विरहाचे हे क्षण हूरहुरनारे मूकपणाने साही
हे आपुलकीचे गंध दिसे चाहूल पिशी पाऊल पिसे
रे सांग आता आवरू कसे मजला मी
मनी जे जे दडले ते गीतातून झगमगते

स्वर- बेला शेंडे
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- हृदयामधले गाणे

Thursday, February 11, 2010

रे फुलांची रोख किम्मत

रे फुलांची रोख किम्मत करू नये कोणी
गंध मातीचा कुपितून भरू नये कोणी

वाट शोधावी,पहावी, वाट भोगावी
गाव आहे दूर म्हणुनी अडू नये कोणी

लाख दु:खे पचवुनी येतात जे डोळा
दोन त्या थेंबांस शुल्लक म्हणू नये कोणी

आस्तिकाला देव नाही म्हणु नये कोणी
एवढे ही ठार नास्तिक असू नये कोणी

सात फुटक्या घागरीतून जन्म हा गळता
थेंब त्यातील एक ही दवडू नये कोणी

सर्व मी सोडून जाता प्रार्थना इतुकी
कोपर्‍यावर ओळखीचे दिसू नये कोणी

स्वर- संदीप खरे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम- कधी हे कधी ते

लाही लाही ऊन ऊन

लाही लाही ऊन ऊन लाही लाही झळा
जगण्याच्या डोक्यातून मरणाच्या कळा

भट्टीतून वाहे जणू वारियाचा झोत
लाल ढग मुशितून सारे जीणे ओत
मातीतून आकारेल पोलादी पुतळा

मृगजळातून दूर बुडालेला गाव
नसलेल्या जळी चाले नसलेली नाव
नसलेली वाट जाते नसलेल्या स्थळा

खुरटल्या झुडूपाचे सुकलेले ओठ
चघळत काटे भरे बकरीचे पोट
खपाटल्या पोटातून भुकेचा सोहळा

नाही नाही ऊन ऊन नाही नाही झळा
काळ्या काळ्या कोकिळेचा पालावला गळा
हाक ओली पाठवली नभातल्या जळा

स्वर- संदीप खरे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम- कधी हे कधी ते

कधी हे बोलले मला

सुधर सुधर…
चल ए काम कर ए
ओ भाऊ नो एण्ट्री दिसली का?
सुधार सुधार…
काही तरी कर आता
ए…अरे अस कुठे असत का?
एकदा सांगितल ना…आत्ता नाही

कधी हे बोलले मला
कधी ते बोलले मला
जीवाची सतत उलघाल चालली माझ्या
वाटचे वाटचे सार्‍या दिशाचे दिशाचे
सार्‍या जीवाचे पाखरू गेले आभाळी शोधत माझ्या

ए..एकदा संगितल ना आता नाही म्हणून
धरेची ओढ मला
नभाचे गूढ मला
कधी ना चालल्या गेल्या
वाटचे भेटणे मला
ढगाळ हवेत घेत पाऊस कवेत
नेते उधाळ पाऊल जीव रानभर दूर माझा
गारवा हा वर कसा वेगळाच सूर माझा
माझ्या तहानेच्या साठी वेगळा पाऊस माझा
वेगळे वाटणे असे वेगळे सांगणे असे
जीवातला सूर थेट ओठावर येई माझ्या

कशास कशास केले नियम बियम सारे
आखीव रेखीव रूप मनाला असते कधी
कधी मोकळ्या वार्‍याचे कधी भरते पाण्याचे
कधी हातात घेऊन कधी दूरुन पहिले कधी
वार्‍याचे झर्‍यास जसे चंदन सूर्यास जसे
माझिया मनास जसे कोंडताना येई मला
आखल्या वाटानी कधी बांधल्या ओठांनी
कधी तेच तेच गात गाणे
जमलेच नाही मला

स्वर- संदीप खरे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम- कधी हे कधी ते

हे नशीब

हे नशीब काही सोडेल
माझी पाठ अस वाटत नाही
या जगण्याचे ही करने
नक्की काय अजुन धाटत नाही

दुखा:वर मी केली अशी मात
हसता हसता दुखून आले दात
आरसा म्हणतो हसणार्‍या बाळा
मी फसत नाही

माझे जीन भरभरलेले ढग
पाण्याने या पोटी लगे राग
देवाजी ची किमया हे पाणी
कधी आटत नाही

चालत राहण्यासाठी जो हट्टी
त्याची नेहमी खडड्यांशी गट्टी
असा मी प्रवासी ज्याला गाव
कधी भेटत नाही

हाती येता कागद लिहितो मी
आपुली आपण टाळी घेतो मी
शब्दांनी या बेरड होता पान
कधी फाटत नाही

दुर्दैवाच्या दुर्दैवाने ते
माझ्या रूपे निर्लज्जा भेटे
कानी देते धमक्या हजार
मी बधत नाही

स्वर- संदीप खरे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम- कधी हे कधी ते

हरल्यासारखे चालायचे

हरल्यासारखे चालायचे
खांदे पाडून खांदे पाडून
बोलल्या सारखे बोलायचे
एवढे सोडून तेवढे सोडून

रस्त्यावर उडवतो कोण तरी कुणा तरी
लाख माशी घोन्गावते विझलेल्या दीपावरी
पुन्हा तेच जाळायचे एक नवे झाड तोडून

गळ्यातून घुसमटतो कफ माझ्या म्हातार्‍याच्या
एक नवा जीव रडे घरातून शेजार्‍याच्या
दोन्ही वेळा पाहायचे डोळे फाडून डोळे फाडून

फक्त दोन शुष्क हात आणि भाळावर घाम
जगण्याचे रामायण आणि हरवला राम
उरातल्या वनवासी फिरे आशा लाज सोडून

तूच दिले पावसाळे उन्हाळे ही दिले तूच
उत्तरे ही तुज ठावे प्रश्न मांडणारा तूच
आम्ही काय करायचे फक्त उभे हात जोडुन

स्वर- संदीप खरे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम- कधी हे कधी ते

हा प्याला शेवटचा

हा प्याला शेवटचा
आता थेंब सुद्धा नको
साधा गंध सुद्धा नको
आली पेंग दिली गालावर टिचकी

उजाडले तरी काय उजाड धरती
मावळता दिस येते डोळ्याला भरती
वर तिचा चंद माझ्या पेल्यातून झुले
घोट घोटा सवे रात कसनुशी बोले

कुणी दिला हात कुणी सावरले मला
कोण रागावले कोण घाबरले मला
भिवून का मनातले बोलणार नाही
मला ठाव कुणालाच कळणार नाही

दिसतात जुने जुने कितीक चेहरे
जुना जुना स्पर्श माझ्या देहात थरारे
जुने घाव आता पुन्हा नव्याने नको रे
हालचालींवर माझ्या क्षणांचे पहारे

अरे आता नको पाजू मला चढली अफाट
दिसू लागे नजरेच्या पल्याडची वाट
देहा सवे वाटेस त्या जाणे नाही होणे
बहिर्‍याच्या गावी नको म्हणायला गाणे

स्वर- संदीप खरे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम- कधी हे कधी ते

एक झाड

एक झाड कमरेमध्ये वाकलेल
पक्षी मोजता-मोजता हिशोब चुकलेल
मुळात चुकल काय…
चुकल काय…चुकल काय
मुळात चुकल काय…पाह्यला झुकलेल

एक मासा पाण्यामुळे पिडलेला
स्वत: मध्ये खोल खोल बुडलेला
रडता येत नाही…
येत नाही..येत नाही…
रडता येत नाही…म्हणून चिडलेला

एक आभाळ उंच उंच टांगलेल
खाली बघून खोल खोल भ्यालेल
ढगात खूपसून मान
खूपसून मान…खूपसून मान
ढगात खूपसून मान धपकून बसलेल

एक शून्य काना कोपरा नसलेल
बेरीज वजा गुणत भागत बसलेल
वेड्या सारख
वेड्या सारख...वेड्या सारख
शून्यात बघत हसलेल

एक मी सार सार बघणारा
दिसतो जिथे कधीच तिथे नसणारा
माझ्यात सारे…माझ्यात सारे
माझ्यात सारे…माझ्यात सारे
माझ्यात सारे…सार्‍यात माझे पाहणारा

एक झाड कमरे मध्ये वाकलेल
एक मासा पाण्यामुळे पिडलेला
एक आभाळ उंच उंच टांगलेल
एक शून्य काना कोपरा नसलेल
एक मी सार सार बघणारा

स्वर- संदीप खरे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम- कधी हे कधी ते

दोन हात

अरे अरे अरे मुलानो…
अरे खूप झाला खेळ
अरे आता थोडे शिकायच
मोठे व्हायच…माणूस व्हायच
अरे आम्ही तुमचे खापर पणजोबा..पणजोबा..आजोबा
माणूस म्हणून जन्मलो…माणूस म्हणून फिरलो…आणि माणूस म्हणूनच वारलो
कसे जगलो ऐकायचाय…माणूस व्हायचय

दोन हात दोन पाय
दोन डोळे कान
छोट्या छोट्या धडावर
सावरतो मान
वार्‍यासवे फिरणार्‍या
पाठीवर पोक
सार्‍या जगाहून मोठे
मानेवर डोके
भांडनार जगाशी भांडनार
माणूस आम्ही ही होणार…

क्षणभर सुखासाठी
जन्मभर मांडणार नाच
धरणीला आकाशाची
आता देऊ बघणार लाच
इसापाच्या बेडकिला
मारूनिया टांग
पोटभर झाले तरी
लावणार रांग
मागणार सारखी मागणार
माणूस आम्ही ही होणार…

एक आला एक गेला
एक नुसता लोंबकळतो
एक कुणी एकासाठी
जन्मभर मौन पाळतो
एक कुणी एक कुणा
एकासाठी साद
एक घळी स्वत:सह
दुसर्‍याशी वाद
पिळनार सारखी पिळनार
माणूस आम्ही ही होणार…

जन्मा आलो जगणार
वेळ आली मरणार
पोट आहे भरणार
पोटापाठी पळणार
दुसर्‍याला छळनार
स्वटळही छळनार
कधी नाही कळणार
कळूनिया वळणार
कधीतरी कुठेतरी
वळणाच्या पाशी
पोट येथे ठेऊनीया
जायचे उपाशी
पिसनार हा जन्म पिसनार
माणूस आम्ही ही होणार…

स्वर- संदीप खरे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम- कधी हे कधी ते

Sunday, February 7, 2010

येईन स्वप्नात

येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
तुझ्या मनाचं गुलाबी फुल देशील का मला??
सांग तुझ्या मनाचं गुलाबी फुल देशील का मला??

वेड हसण्याची वेड दिसण्याची वेड रुसण्याची ग
वेड्या चंद्राची वेड्या ता-यांची रात्र वेडाची ग
वेड्या प्रश्नाच वेडं उत्तर देशील का मला??
तुझ्या मनाचं गुलाबी फुल देशील का मला??

माझ्या नेत्रात माझ्या गात्रात मनात माझिया
तुझ्या गंधाचा तुझ्या छंदाचा उधाणे पुरिया
तुझ्या भरतीचा चंद्र नवतीचा करशील का मला??
सांग तुझ्या मनाचं गुलाबी फुल देशील का मला??

बघ जरा एकदा , ऐक माझ्या फुला
मौन माझे आता सांगू बघते तुला
तुच स्वप्नातली चंद्रिका साजिरी
तुच सत्यातली मोहिनी लाजरी
अभ्र विरताना रात्र ढळताना येशील का जरा??
कोणी नसताना काही कळताना येशील का जरा??
तुझ्या नावात माझ्या नावाला घेशील का जरा??
सांग तुझ्या मनाचं गुलाबी फुल देशील का मला??

स्वर- संदीप खरे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम- मी गातो एक गाणे

विश्वारंभापासून येथे

विश्वारंभापासून येथे नांदत आहे गाणे...
आभाळाचे, दरी-शिखरांचे, निळ्या नद्यांचे गाणे

अग्निच्या ज्वाळांतुन फूलते लवलव लपलप गाणे
वेळूच्या वार्‍यातुन झुलते मंजुळ मुरली गाणे
पाण्यामधुनी वाहात असते अवखळ खळखळ गाणे
वीज नभाची गाउन जाते कडाड कडकड गाणे
महाभुतांच्या ह्रुदयांतरीही अमीट असते गाणे,
विश्वारंभापासून येथे नांदत आहे गाणे

हसण्याचेही होते गाणे, फसण्याचेही गाणे
असण्याचेही असते गाणे, नसण्याचेही गाणे
आनंदाचे खजिने आंदण अन दुखा:ला देते कोंदण,
सदैव रुंजी घालत आहे मनीमानसी गाणे

आभाळाचे, दरी-शिखरांचे, निळ्या नद्यांचे गाणे
विश्वारंभापासून येथे नांदत आहे गाणे

स्वर- संदीप खरे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम- मी गातो एक गाणे

रात्र सुंदर

रात्र सुंदर, चंद्र सुंदर
रात्र काळी होत शाई, मन्मनाच्या कागदांवर

हे निघाले तारकांचे संथ तांडे डोंगराशी
रात्र थकल्या काफिल्यापरी उतरणीवर चहूदिशांशी
हे निघाले दव धुळीचे लोट अन् आले धरेवर
रात्र सुंदर, चंद्र सुंदर

शांतता ही काय वर्णू, तव मिठीसम आर्त सुंदर
चांदण्याने बहकलेल्या रात्रीचे या हर गात्र सुंदर
या तुझ्या अनिवार सयीचे जीवघेणे सत्र सुंदर
रात्र सुंदर, चंद्र सुंदर

रात्र ओला शब्द मागे, या जिण्याचा अर्थ मागे
निरवतीच्या अक्षरांवर एक हळवी रेघ उमटे
रात्र वेडी, चंद्र वेडा, वेड माझे येई भरावर
रात्र सुंदर, चंद्र सुंदर

स्वर- संदीप खरे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम- मी गातो एक गाणे

मी गातो एक गाणे

मी गातो एक गाणे
पान वाजवते टाळी
त्याच्या धिटाईने एक
लाज लाजलेली कळी

रात लाजुनिया गेली
दिले पहाट बहाने
पाना पानात ठेवले
तिने दवाचे उखाणे

आळसावल्या नदीची
अशी मोहक वळणे
वेड लावित नभाला
तिचे स्वत:त नहाने

कुणी नाही जरी येथे
कशी वाजती पैंजणे
अशी चांदण चाहूल
कुन्या पावलांचे देणे

रान भर चंद्र चंद्र
त्याचे गात गात गाणे
रात भर शिळेवर
कुणी पाखरू दिवाणे

तुझ्या डोळ्यातल्या रानी
असे रानभर होणे
अशा वनात कबूल
आम्हा वनवासी होणे

स्वर- संदीप खरे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम- मी गातो एक गाणे

मन होई मेघवेड

मन होई मेघवेड ओल्याराती
मेघ गाई मेघधून कोणासाठी

दिस रुसून गेला सामसूम
रात धरी बोट ये म्हणून
नभी मेघ पाणी डोळा देत जाती

आई दे ग कुशी हळूवार
गाई तेच गाणे एकवार
घाव दुनियेने दिलेले खोल जाती

उद्या उजाडेल पुन्हा ठाव
नाव तेच तेच पुन्हा गाव
या जगाची रीत ठावे तीच कोती

स्वर- संदीप खरे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम- मी गातो एक गाणे

हळू हळू तिने मला

हळू हळू तिने मला
कुशीत खोल घेतले
निरांजनापरी मनात
शांत दीप लागले

अबोल रातराणी काय
बोलली व्यथासवे
हळू हळू हवेतले
सुगंध संथ सांडले

बंद बंद पाकळ्यात
मंद गंध कोंडले
कुणी तरी म्हणा आता
उजाडले उजाडले

मिटून चालली हळूच
अंतरात अंतरे
कुणी न हात लावताच
स्पर्श स्पर्श जाहले

बसायचे जरा
बघायचे तुला...परतुनी
निघायचे…
दिशा पल्याड
दूर कोणी थांबले

स्वर- शैलेश रानडे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम- मी गातो एक गाणे

घेत निरोप नभाचा

घेत निरोप नभाचा
बघ निघाला दिवस
थोडे ठेऊन घेऊन
थोडे निघाला दिवस

तसे मुख मावळतीचे
उदास उदास
तसा गार वारा वाहे
जसा खोल श्वास
दूरच्या दिव्यांना देत
निघाला दिवस

विझवुनी दिवसाचा दीप
पेटवून रात
पडे देह अवनीचा या
तमाच्या कुशीत
थोडा अधीरसा श्वास
थोडा दिलासा दिवस

आता गाऊ द्यावे गाणे
जसे गाऊ वाटे
अंगणात येतील स्वप्ने
पहाटे पहाटे
गाव मन नाव ज्याचे
त्याची ढासळते वेस

स्वर- शैलेश रानडे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम- मी गातो एक गाणे

चला रे माझ्या...

चला रे माझ्या थकल्या पायांनो
हला रे माझ्या हरल्या हातांनो
दमायचे नाही बसायचे नाही
प्राक्तनावरती रुसायचे नाही

काहीही सूचू दे काही ना सूचू दे
अंतरी चंदन पेटते असु दे
कापरासारखे जळायचे नाही
काही न ठेवता विझायचे नाही

जपत जपत नभाची थोरवी
करायची आहे माती ही हिरवी
जो वरी सुचते पावसाचे गाणे
हिरमुसवाणे व्हावयाचे नाही

तळाशी फुटकी भरत कळशी
जपायची उरी युगांची असोशी
एका गावी फार थांबायाचे नाही
धाकटया गर्दीत रमायचे नाही

स्वर- शैलेश रानडे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम- मी गातो एक गाणे

बरं झालं

या जमिनीत
एकदा स्वतःला गाडून घेईन म्हणतो.
चारदोन पावसाळे बरसून गेले
की रानातलं झाड बनून
परत एकदा बाहेर येईन . . .
म्हणजे मग माझ्या झाडावरच्या
फांदीफांदीलाच मीच असेन . . .
पानापानांतून, देठादेठावर,
येणारे जाणारे क्षणभर थबकून,
सुस्कारत म्हणतील -
" बरं झालं हे झाड आलं !
अगदीच काही नसण्यापेक्षा . . . !"

आणि पानापानांतून माझे चेहरे
त्यांना ही नकळत न्याहाळत खुदकन् हसतील . . .
माझ्या पानांतून वाट काढणार्‍या सूर्यकिरणांबरोबर
माझं हसू आणि झुळूकश्वास
माझ्या सावलीतल्या लोकांवर पसरून देईन . . .
त्यांच्या घामाचे ओघळ
माझ्या सावलीत सुकताना मी हळूच म्हणेन -
" बरं झालं मी झाड झालो . . .
अगदीच काही नसण्यापेक्षा . . . !"

आत्तापर्यंत हूल देणारी ती स्वप्निल पाखरं
आता त्यांच्याही नकळत माझ्या अंगाखांद्यांवर झोके घेतील . . .
त्यांची वसंतांची गाणी
उडत माझ्या कानी येतील . . .
ती म्हणतील -
" बरं झालं इथे झाड आलं . . .
नाहीतर सगळा रखरखाटच होता !

याच जागी आपल्या मागे लागलेला
तो वेडा कवी कुठे गेला ?"
मी पानं सळ्सळ्वत कुजबुजीन -
" बरं झालं मी झाड झालो . . .
वेडा कवी होण्यापेक्षा

आणखी काही वर्षांनी
मी सापडतच नसल्याचा शोध
कदाचित, कुणाला तरी लागेलही . . .
एखाद्या बेवारस, कुठल्याही
पण आनंदी चेहर्‍याच्या शवापुढे
ते माझ्या नावाने अश्रु ढळतील . . .
माझी वेडी गाणी आठवत
कोणी दोन थेंब अधिक टाकेल . . .
आणी . . .

माझ्या चितेच्या लाकडांसाठी
माझ्याचभोवती गोळा होत
घाव टाकता टाकता म्हणतील -
" बरं झालं हे झाड इथे आलं
अगदीच लांब जाण्यापेक्षा . . ."

माझ्या वरती कोणी मी
राख राख बनताना
धूर सोडत हळूच म्हणेन
" बरं झालं मी झाड झालो . . .
अगदीच कुजुन मरण्यापेक्षा

स्वर- संदीप खरे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम- मी गातो एक गाणे

Wednesday, February 3, 2010

व्यर्थ हे सारेच टाहो

व्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात राहो,
मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची

पैज जे घेती नभाशी, आणि धडका डोंगराशी
रक्त ज्यांचे तप्त आहे फक्त त्यांना हक्क आहे,
श्वास येथे घ्यावयाचा, आग पाण्या लावण्याचा,
ऊरफाड्या छंद आहे, मृत्यु ज्यांना वंद्य आहे,
साजिर्‍या जखमा भुजांशी, आणि आकांक्षा ऊराशी,
घाव ज्यांचा भाव आहे, लोह ज्यांचा देव आहे,
माती हो विभुती जयांची, ही धरा दासी तयांची,
मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची

शब्द लोळाचे तयांचे, नृत्य केवळ तांडवाचे,
सूरनिद्रा भंगण्याला छिन्नी-भाकीत कोरण्याला,
जे न केवळ बरळती गोड गाणी कोरडी,
जे न केवळ खरडती चंद्र-तार्‍यांची स्तुती,
झेप ज्यांनी घालुनी, अंबरांना सोलुनी,
तारका चुरगाळल्या, मनगटाला बांधल्या,
ग्रह जयांची तोरणे, सूर्य ज्यांचे खेळणे,
अंतराळे माळती, सागरे धुंडाळती ,
वन्हीला जे पोळती, रोज लंका जाळती,
ही अशी शेपूट जयांची, ही धरा दासी तयांची
मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची

हस्तकी घेऊन काठी, केशरी घालून छाटी,
राम ओल्या तप्त ओठी, राख रिपूची अन ललाटी,
दास ऐसा मज दिसू दे, रोमरोमांतून वसू दे,
सौख्य निब्बरशा त्वचेशी वेदना ही ठस ठसू दे,
थेंब त्या तेजामृताचा मज अशक्ताला मिळू दे,
कांचनातून बद्ध जिण्या परीस पोलादी मिळू दे,
जे स्वतःसाठीच वाहे रक्त ते सारे गळू दे,
रक्त सारे लाल अंती, पेशीपेशींना कळू दे,
अश्रु आणि घाम ज्यांनी मिसळोनी रक्तामधोनि,
लाख पेले फस्त केले आणि स्वतःला मस्त केले,
त्या बहकल्या माणसांची, त्या कलंदर भंगणांची,
ही नशा आकाश होते, सर्जराचा कोष होते,
ही अशी व्यसने जयांची, ही धरा दासी तयांची,
मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची

स्वर- संदीप खरे, सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- सांग सख़्या रे

तुझे नी माझे नाते काय?

तुझे नी माझे नाते काय?...
तु देणारी... मी घेणारा
तु घेणारी... मी देणारा
कधी न कळते रुप बदलते
चक्राचे आवर्तन घडते
आपुल्यामधले फरक कोणते?
अन आपुल्यातुन समान काय?....
तुझे नी माझे नाते काय?...

मला खात्री आहे तिला ही झोप आली नसेल
सुंदर स्वप्न पडत असतील
पण कुशीवर वळेल..उसासे घेईल
तिच्या समोर ही तेच ढग जे माझ्या समोर
तिच्या समोर ही तेच धुके जे माझ्या समोर
तिचे माझे स्वल्प विराम ही सारखे
अन् पूर्ण विराम ही
म्हणून तर मी असा आकंठ जागा असता
तिची ही पापणी पूर्ण मिटली नसेल
मला खात्री आहे तिला झोप आली नसेल

सुखदु:खाची होता वृष्टी
कधी हसलो, कधी झालो कष्टी
सायासाविन सहजची घडते
समेस येता टाळी पडते!
कुठल्या जन्माची लय जुळते?
या मात्रान्चे गणित काय?
तुझे नी माझे नाते काय?...

बगिचे लावले आहेत आम्ही एकत्र... एकाकी
माती कालवली आहे आम्ही चार हातांनी
नखात आहे माती आम्हा दोघांच्या...अजूनही
मनात फुलं आहेत आम्हा दोघांच्या... अजूनही
दोघांच्याही हातावर एकमेकांच्या रेषा आहेत !
दोघांच्याही हातावर एकमेकांच्या भाषा आहे !
रात्र होऊन जाईल चंद्र चंद्र आणि मी जागाच असेन;
तेव्हा बर्फाच्या अस्तराखाली वाहत राहावी नदी
तशी ती ही जागीच असेल...
मला खात्री आहे तिलाही झोप आली नसेल...

नात्याला या नकोच नाव
दोघांचाही एकच गाव!
वेगवेगळे प्रवास तरीही
समान दोघांमधले काही !
ठेच लागते एकाला
का रक्ताळे दुसर्‍याचा पाय?
तुझे नी माझे नाते काय?...

स्वर- संदीप खरे, सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- सांग सख़्या रे

सांग सख़्या रे

सांग सख़्या रे आहे का ती अजुन तैशीच गर्द राईपरी
सांग सख़्या रे अजुन का डोळ्यातून तिचिया झुलते अंबर?
सांग अजुनही निजेभोवती तिच्या रातराणीचे अस्तर?
सांग अजुनही तशीच का ती अस्मानीच्या निळाईपरी?

फ़ुले स्पर्शता येते का रे अजुन बोटामधूनी थरथर?
तिच्या स्वरानी होते का रे सांज अवेळी अजून कातर?
अजुनही ती घुमते का रे वेळुमधल्या धुन्द शीळेपरी?

वयास वळणावर नेणारा घाट तिचा तो अजुन का रे?
सलज्ज हिरव्या कवितेजैसा थाट तिचा तो अजुन का रे?
अजुन का ती जाळत जाते रान कोवळे जणु वणव्यापरी?

सांग जशी ती मिटली होती जरा स्पर्शता लाजाळुपरी
आणिक उमटून गेली होती लाली अवघ्या तारुण्यावरी
तिने ठेवला आहे का रे जपुन क्षण तो मोरपिसापरी

अता बोलणे आणि वागणे यातील फ़रकाइतुके अंतर
पडले तरिही जाणवते मज कवितेमधुनी तिचीच थरथर
सांग तिला मी आठवतो का तिजवर रचलेल्या कवितेपरी

स्वर- संदीप खरे, सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- सांग सख़्या रे

प्रिये ये निघोनी-ऊन्हवेळा

नको ओढ लाऊन घेऊ ऊन्हाची
जसे पारधी हे तसे तीर् तोचि
दिसांमागुनी गे पिसे दग्ध होती
भरारी पडे मृत्यूकेशीच अंती

तसे उन्ह मार्गात होतेच माझ्या
पदांशी भुमी तप्त होतीच माझ्या
परंतु तुझे हात हातात आले
व्यथाचे तळे ग निलेशार झाले

न ठावे किती वेळ चालेल खेळ
न ठावे किती चावी या माकडाची
जशी ओढती माळ तैशीच मोजू
भली लांब जपमाळ फुटक्या क्षणांची

फुला या उन्हाचा तुला ठाव नाही
बरे तप्त देशी तुझा गाव नाही
म्हणोनि तुझे ओठ गातात ओले
तुझ्या नेत्री निष्पापता घेई झोली

प्रिये ये निघोनी घनांच्या कडेने
मला एकटेसे….

स्वर- संदीप खरे, सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- सांग सख़्या रे

प्रिये ये निघोनी

प्रिये ये निघोनी घनांच्या कडेने
मला एकटेसे आता वाटताहे
कुणालाच जे सांगता येत नाही
असे काहीसे मन्मनी दाटताहे

असे वाटते की तुझ्या पास यावे
तुझ्या सौम्य नेत्रातले नीर व्हावे
परंतू मला वेळ बांधुन नेते
कधी मुक्तता हे कुणाला ना ठावे

सये पाय दगडी नि दगडीच माथा
अशा देवळातून जाऊन येतो
न देई कुणा घेतल्यावीण त्याला
नमस्कार नेमस्त देउन येतो

असे वाटते की कधी कोणी नव्हतो
न आहे, न वाहे उरातुन श्वास
उरा- अंतरातुन यांत्रिकतेने
फिरे फक्त वारा किंवा तो ही भास

दिसे जे कवीला न दिसते रवीला
सांगून गेले कुणीसे शहाणे
मला तू न दिसशी परंतू तयांच्या
नशिबी कसे सांग तुजला पहाणे

असे वाटणे ही अशी सांज त्यात
दुरावा स्वत:शी, तुझ्याशी दुरावा
किती फाटतो जीव सगळ्यात ह्यात
मिठीतुन देईन सगळा पुरावा

स्वर- संदीप खरे, सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- सांग सख़्या रे

पाऊस असा रुणझूणता

पाऊस असा रुणझूणता
पैंजणे सखीची स्मरली
पाऊल भिजत जाताना
चाहूल विरत गेलेली...

ओलेत्याने दरवळले
अस्वस्थ फुलांचे घोस
ओलांडून आला गंध,
निस्तब्ध मनाची वेस

पाऊस सोहळा झाला ,
पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणीचा
कधी उधाणता अन
केव्हा थेंबांच्या संथ लयीचा

नभ नको नको म्हणताना
पाउस कशाने आला
गात्रातून स्वच्छंदी अन
अंतरात घुसमटलेला

स्वर- संदीप खरे, सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- सांग सख़्या रे

लागते अनाम ओढ

लागते अनाम ओढ श्वासांना
येत असे उगाच ओठाना
होई का असे तुलाच स्मरताना.....
तनन धिमदा देरेना देरेना...तनन धिमदा देरेना देरेना…

हसायचीस तुझ्या वस्त्रासारखीच फिकी फिकी
माझा रंग होऊन जायचा उगाच गहिरा
शहाण्यासारखे चालले होते तुझे सारे
वेड्यासारखा बोलून जायचा माझा चेहरा

एकांती वाजतात पैंजणे
भासांची हालतात कंकणे
कासावीस आसपास बघताना.....

संवादांचे लावत लावत हजार अर्थ
घातला होता माझ्यापाशी मीच वाद
नको म्हणून गेलीस ती ही किती अलगद
जशी काही कवितेला द्यावी दाद

मी असा जरी निजेस पारखा
रात्रीला टाळतोच सारखा
स्वप्न जागती उगाच निजताना.....

सहजतेच्या धूसर तलम पडद्यामागे
जपले नाहीस नाते इतके जपलेस मौन
शब्दच नव्हे मौन ही असते हजार अर्थी
आयुष्याच्या वेड्या वेळी कळणार कुठून?

आज काल माझाही नसतो मी
सर्वातुन एकटाच असतो मी
एकटेच दूर दूर फ़िरताना.....

स्वर- संदीप खरे, सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- सांग सख़्या रे

ही तरुणाई

ही तरुणाई…
आभाळाची निळाई... सागराची गहराई
हरेक क्षणाच्या डोळ्यातली रोषणाई...

कधी वाटा पुढती पळते
कधी जागीच गिरक्या घेते
वारा ही... पारा ही... हातात ठरत नाही रे नाही नाही...

ही थरथरती वेळ
हा हूरहुरण्याचा खेळ
आभाळ सांगते कानात हिच्या रे काही रे काहीबाही...

या हृदयाच्या ठोक्याने
ही झुलवीत जाई गाणे
रंगते...सांगते...स्वप्नांच्या देशीची बेधुन्द नवलाई...

मेघ होऊन कधी हुंकारे
सतार होऊन कधी झंकारे
दिसते अशी की घाटात सजते हिरवी वनराई...

ही मैफिल एक सुहानी
ही मादक अन् मस्तानी
ही शहाण्याहूनही शहानी
कधी कम्बख्ताची गाणी
'ये' म्हणून येईना..'जा जा' म्हणून
जात ती नाही नाही नाही...

स्वर- संदीप खरे, सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- सांग सख़्या रे

अल्कोहोल

अरे बेगम बाजार तो हो आया मैं
लेकिन अनाज नही…हा कुछ
शीशे का समान ज़रूर लाया हूँ
खुदा ने कहा है…
बंदे तेरे खाने का जिम्मा मेरे सर पर
लेकिन पीने के बारे मे उसने कुछ नही कहा
सो पीने की ज़िम्मेदारी मैने ही लेली

रात्रीच्या उदरात उदासीन मळमळनारे अल्कोहोल
भल्या पहाटे छातीमध्ये जळजळणारे अल्कोहोल

दुनियेसाठी टाकाऊ अन् नकोनकोसे गटार हे
माझ्यासाठी निर्झर होऊन खळखळणारे अल्कोहोल

हवाहवासा गंध जिण्याचा हवेत हलके विरताना
नको नकोसा दर्प होऊनि दरवळणारे अल्कोहोल

साथ कुणी इतुकी ना देते, हाक कुणाची ना मिळते
रक्तासोबत इमान होऊन विरघळणारे अल्कोहोल

घाव बैसता तडफडतो जीव ! ना उरतो ना जातोही !
शेपूट तुटकी पाल होऊनि वळवळणारे अल्कोहोल

जगास वाटे अनैतिक जे, निषेध करते जग ज्याचा
अशा अबोल दुखांवरही हळहळणारे अल्कोहोल

सन्मानाचे दिवस झेलतो, जरी कौतुके जग अवघे
तिच्या कटाक्षावाचून रात्री तळमळणारे अल्कोहोल

फना काढल्या मृत्यूवरती मोहून गेला मंडूक मी
जातीवंतसे जहर होऊनी सळसळणारे अल्कोहोल

रसायनांची किमया नामी ! यमदुतांचे कष्ट कमी !
हे मृत्युचे भाग्य होऊनी फळफळणारे अल्कोहोल

मी त्या पितो ! ते मज पिते ! दोघांमध्ये खेच सुरू...
पुरून उरूनी थडग्यापाशी भळभळणारे अल्कोहोल !

स्वर- संदीप खरे, सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- सांग सख़्या रे

अजुन उजाडत नाही ग !

अजुन उजाडत नाही ग !
अजुन उजाडत नाही ग !

दशकामागून सरली दशके
अन् शतकाच्या गाथा ग !
ना वाटाचा मोह सुटे वा
ना मोहांच्या वाटा ग!
पथ चकव्याचा, गोल,
सरळ वा कुणास उमगत नाही ग
प्रवास कसला? फरफट अवघी !
पान जळातून वाही ग...

कधी वाटते 'दिवस'-'रात्र' हे
नसते काही असले ग
त्यांच्यालेखी रात्र सदाची
ज्यांचे डोळे मिटले ग
स्पर्श आंधळे.. गंध आंधळे भवताली वनराई ग
तमातली भेसुर शांतता... कानी कूजन नाही ग...

एकच पळभर एखादी कळ
अशी सनाणुन जाते ग
क्षणात विरती अवघे पडदे
लख्ख काही चमचमते ग !
ती कळ सरते... हूरहुर उरते अन् पिकण्याची घाई ग
वरवर सारे शिंपण काही आतून उमलत नाही ग…

स्वर- सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- सांग सख़्या रे

तुटले

आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...
बाकी सारे आकार, उकार, होकार, नकार...
मागे पडत चाललेल्या स्टेशनांसारखे
मागे मागे जात जात पुसटत चालले आहेत...
पुसत जावेत ढगांचे आकार
आणि उरावं एकसंध आभाळ, तसा भूतकाळ
त्याच्या छातीवर गवताची हिरवीगार कुरणं,
भरून आलेली गाफील गाणी, काळेसावळे ढग
आणि पश्चिमेच्या वक्षाकडे रोखलेले बाणाकृतीतील बगळे
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

बंध रेशमी तुझ्यासवे जे जुळले
अन् क्षितिजावर रंग नवे अवतरले
घन दाटताच एका क्षणात हे रंगबंध विस्कटले...तुटले....

विसरत चाललोय... नावेतून उतरताना आधारासाठी धरलेले हात
विसरत चाललोय होडीची मनोगते, सरोवराचे बहाणे,
वा नावेला नेमका धक्का देणारी ती अज्ञात लाट
ती लाट तर तेव्हाच पुसली... मनातल्या इच्छेसारखी
सरोवर मात्र अजूनही तिथेच...
पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली
आता तर लाटा नव्हे, पाणी सुद्धा नवंय कदाचित
पण तरीही जुन्याच नावाने सरोवराला ओळखतायत सगळे...
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

क्षण दरवळत्या भेटींचे, अन् हातातील हातांचे
ते खरेच होते सारे..वा मृगजळ हे भासांचे
सुटलेच हात आता मनात हे प्रश्न फक्त अवघडले...तुटले...

तुझ्याकडे माझी सही नसलेली एक कविता...मीही हट्टी...
माझ्याकडे तुझ्या बोटांचे ठसे असलेली काचेची पट्टी
चाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे...अजूनही...
थोडेसे शब्द, बरंचसं मौन...अजूनही...
बाकी अनोळखी होऊन गेलो आहोत...
तुझा स्पर्श झालेला मी, माझा स्पर्श झालेली तू...
आणि आपले स्पर्श झालेले हे सगळे...
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

मज वाटायाचे तेव्हा हे क्षितिजच आले हाती
नव्हताच दिशांचा दोष, अंतरेच फसवी होती...
फसवेच ध्यास फसवे प्रयास आकाश कुणा सापडले...तुटले...

उत्तरे चुकू शकतात, गणित चुकत नाही...
पावले थकू शकतात, अंतरे थकत नाहीत...
वाळूवरची अक्षरं पुसट होत जातात..
डोळ्यांचे रंग फिकट होत जातात..
तीव्रतेचे उग्र गंध विरळ होत जातात..
शेपटीच्या टोकावरचे हट्ट सरळ होत जातात..
विसरण्याचा छंदच जडलाय आताशा मला..
या कवितांना, शहरभर पसरलेल्या संकेतस्थळांना...
विसरत चालल्या आहेत..पत्ता न ठेवता निघून गेलेल्या वाटा..
विसरत चालले आहे तळ्यावर बसलेले पश्चिमरंगी आभाळ..
अन् विसरत चालले आहे...
आभाळही गोंदायला विसरणारे हिरवेगर्द तळे
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

मी स्मरणाच्या वाटांनी वेड्यागत अजून फिरतो
सुकलेली वेचीत सुमने, भिजणारे डोळे पुसतो...
सरताच स्वप्न अंतास सत्य हे आसवांत ओघळले...तुटले...

आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

स्वर- संदीप खरे, सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- सांग सख़्या रे

Tuesday, February 2, 2010

तुझ्या माझ्यासवे कधी

तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
तुला बोलावता पोचायचा पाऊसही

पडे ना पापणी पाहून ओलेती तुला
कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही

तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही

मला पाहून ओला विरघळे रुसवा तुझा
कशा युक्त्या मला सुचवायचा पाऊसही

कशी भर पावसातही आग माझी व्हायची
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही

आता शब्दांवरी या फक्त उरलेल्या खुणा
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही

स्वर-सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- नामंजूर

नामंजूर

नामंजूर! नामंजूर! नामंजूर!
जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!

मला ऋतुंची साथ नको अन् कौल नको
मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको
मुहुर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा
वेळ पाहुनि खेळ मांडणे - नामंजूर!

माझ्याहाती विनाश माझा! कारण मी!
मोहासाठी देह ठेवतो तारण मी!
सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर
मज अब्रूचे थिटे बहाणे - नामंजूर!

रुसवे-फ़ुगवे,भांडणतंटे लाख कळा
आपला- तुपला हिशोब आहे हा सगळा
रोख पावती इथेच द्यावी अन् घ्यावी
गगनाशी नेणे गार्‍हाणे - नामंजूर!

मी मनस्वीतेला शाप मानले नाही
अन् उपभोगाला पाप मानले नाही
ढग काळा ज्यातुन एक ही फिरला नाही
नभ असले मी अद्याप पाहिले नाही

नीती, तत्वे... फ़सवी गणिते! दूर बरी!
रक्तातील आदिम जिण्याची ओढ खरी!
जगण्यासाठी रक्त वहाणे मज समजे,
पण रक्ताचा गर्व वहाणे - नामंजूर!

स्वर- संदीप खरे, सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- नामंजूर

मी हजार चिंतांनी

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो,
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो

मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी,
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वछंदी,
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो,
तो लंघुन चौकट पार निघाया बघतो

डोळ्यात माझीया सुर्याहुनी संताप,
दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप,
तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते,
घड्वून दागिने सुर्यफुलांपरी झुलतो

मी पायीरुतल्या काचांवरती चिडतो,
तो त्याच घे‌ऊनी नक्षी मांडून बसतो,
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती,
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो

मी आस्तिक मोजत पुण्या‌ईची खोली,
नवसांची ठेवून लाच लावतो बोली,
तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या
अन धन्यवाद देवाचे घेवून जातो

मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार,
लपतो न परि चेहरा आत भेसूर,
तो फक्‍त ओढतो शाल नभाची तरीही,
त्या शाम निळ्याच्या मोरपीसापरि दिसतो

स्वर- संदीप खरे
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- नामंजूर

मेघ नसता वीज नसता

मेघ नसता वीज नसता, मोर नाचु लागले,
ज़ाहले इतुकेच होते कि तुला मी पाहिले

गोरट्या गालांवरी का चोरटा हा रक्तिमा,
तू मला चोरून बघताना तुला मी पाहिले

एवढे नाजूक आहे वय तुझे माझ्या फ़ुला,
रंग देखील पाकळ्यांवर भार वाटू लागले

लाख नक्षत्रे उराशी नभ तरीही हळहळे,
हे तुझे नक्षत्र वैभव का धरे वर राहिले ?

पाहता तुज रंग उडुनी होई गजरा पांढरा
शल्य हे त्याच्या उरातील बघ सुगंधू लागले

भर पहाटे मी फ़ुलांनी दृष्ट काढून टाकली,
पाहती स्वप्नी तुला जे भय तयांचे वाटले

स्वर- संदीप खरे
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- नामंजूर

कितीक् हळवे, कितीक् सुंदर

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर
त्याच जागी त्या येऊन जाशी, माझ्यासाठी... माझ्यानंतर

अवचीत कधी सामोरे यावे
अन् श्वासांनी थांबून जावे
परस्परांना त्रास तरीहि, परस्पराविण ना गत्यंतर

मला पाहुनी दडते-लपते,
आणिक तरीहि इतूके जपते
वाटेवरच्या फुलास माझ्या लावून जाते हळूच फत्तर

भेट जरी ना ह्या जन्मातुन,
ओळख झाली इतकी आतून
प्रश्न मला जो पडला नाही त्याचेही तुज सुचते उत्तर

मला सापडे तुझे तुझेपण,
तुझ्या बरोबर माझे मीपण
तुला तोलुनी धरतो मि अन्, तु ही मजला सावर् सावर

मेघ कधी हे भरुन येता,
अबोल आतून घुसमट होता
झरते तिकडे पाणि टप् टप् अन् इकडेही शाई झर् झर्

स्वर- संदीप खरे, सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- नामंजूर

देवा मला रोज एक

देवा मला रोज एक अपघात कर
आणि तिच्या हातांनीच जखमा या भर

कधी तरी कुठे तरी बसावी धडक
कळ मला यावे तिला कळावे तडक
घायाळाला मिळो एक घायाळ नजर…हाय

अपघाती सोन्ग माझे वाटावे खरे
तिला येता प्रेम मला वाटावे बरे
दवा दारू मधे कुठे असतो असर..अं

खरी व्यथा तेव्हा मग सांगेन तिला
विचारेल जेव्हा कुठे दुखते तुला
जरा डावीकडे जरा पोटाच्या या वर

टेकवता छातीवर डोके एकवार
ठोका घेई झोका उडे आभालाच्या पार
व्यथाचाच काय पडे जगाचा विसर

स्वर- संदीप खरे
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- नामंजूर

अजुन तरी रुळ सोडुन

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा

आमच्या देखील मनी आले चांदण्याचे पुर
आम्हालाही दिसल्या शम्मा अन शम्मेचे नूर
अजुन तरी परवाना हा शम्मेपासुन दुर
मैत्रिणीच्या लग्ना गेलो घालुन काळा झब्बा

कुणी नजरेचा ताणुन नेम केलेली जखमी
कुणी ओठांची नाजुक अस्त्रे वापरली हुकमी
अन शब्दांचे जाम भरुन पाजियेले कोणी
मयखान्यातही स्मरले आम्हा मंदिर मस्जिद काबा

कधी गोडीने गाउ गेलो जोडीने गाणी
रमलो हे जरी विसरुन सारे आम्ही खुळ्यावानी
सर्वस्वाची घेउनी दाने आले जरी कुणी
अजुन तरी सुटला नाही हातावरचा ताबा

कोण जाणे कोण मजला रोखुन हे धरते
वाटा देती हाका तरिही पाउल अडखळते
कुठल्या शपथेसाठी माझी ओंजळ थरथरते
मोहाहुन ही मोहक माझी हुरहुरण्याची शोभा

स्वर- संदीप खरे, सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- नामंजूर

आताशा मी फक्त

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो
चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो

व्याप नको मज कुठला ही अन् ताप नको आहे
उत्तर कुठले मुळात मजला प्रश्न नको आहे
या प्रश्नाशी अवघ्या परवा करार मी केला
मी न छळावे त्यांना त्यांनी छळू नये मजला
बधीरतेच्या पुंगीवर मी नागोबा डुलतो

आता आता छाती केवळ भीती साठवते
डोंगर बघता उंची नाही खोली आठवते
आता कुठल्या दिलखूष गप्पा उदार गगनाशी
आता नाही रात्र ही उरली पूर्वीगत हौशी
बिलन्दरीने कलन्दरीची गीते मी रचतो

कळू ना येता जगण्याची या इवलीशी त्रिज्या
बुडून जाती अत्तरापरि जगण्याच्या मौजा
दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा
राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा
कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो

स्वर- सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- नामंजूर

Monday, February 1, 2010

सुपरमँन सुपरमँन

सुपरमँन सुपरमँन सुपरमँन
वरतून चड्डी आतून पँट

अंगामध्ये ताकद फार, पोलादाची जणू पहार
पक्षी नाही तरी उडतो, मासा नाही तरी बुडतो
उडण्याचाही भलता वेग, पँरीस पनवेल सेकंद एक
रोज पृथ्वीला चकरा पाच, गेला म्हणता हा आलाच
गरुडाहूनही थेट नजर, जिथे संकटे तिथे हजर
कोसळती बस हा अडवी, फुंकरीत वणवा विझवी
अंतराळीचे व्हिलन कुणी, त्यांच्याशी दण्णादण्णी
अवघी दुनिया त्याची फँऽऽऽऽऽन
सुपरमँन सुपरमँन सुपरमँन

जरी जगाहून भिन्न असे, तरी मनातून खिन्न असे
आदर करती सर्व जरी परी न कोणी मित्र तरी
लांबून कौतुक हे नुसते, कुणी न मजला हे पुसते
जेवण झाले काय तुझे, काय गड्या हे हाल तुझे
दिवस रात्र हे तू दमशी, सांग तरी मग कधी निजशी
उडता उडता असे सुसाट, दुखते का रे मधेच पाठ
एकएकटे फिरताना, विचार करतो उडताना
आत रिकामे का वाटे, कसे वाटते सर्व थिटे
अंगी ताकद जरी अफाट, काय नेमके सलते आत
करुन बसला तोंड लहाऽऽऽऽन
सुपरमँन सुपरमँन सुपरमँन

असा एकदा एक दिशी उंच हिमाच्या शिखराशी
बसला असता लावून ध्यान त्यास भेटला मग हनुमान
काय तयाचे रूप दिसे सुर्याचे प्रतिबिंब जसे
शक्ती ही अन् युक्ती ही, तरी अंतरी भक्ती ही
आणि बोलले मग हनुमान....
ऐक ऐक हे सुपरमँन, ऐक ऐक हे सुपरमँन
ऐक ऐक हे सुपरमँन, ऐक ऐक हे सुपरमँन
रोनी सी ये सूरत क्यूँ? मित्रा I am proud of you!!
सर्वाहून आगळाच तू, जैसा मी रे तैसा तू
ऐक एवढे ते अवधान, शक्ती युक्ती चे हे वरदान
त्या रामाने दिले तुला, त्याने बनवले तुला मला
त्या रामास्तव करणे काम, त्या रामास्तव गळू दे घाम
साथ जरी ना कुणी असे, आत तुझ्या पण राम असे
राम राम हे म्हणत रहा, आणि जगाला भिडत रहा
त्या रामाचे करूनी ध्यान, चिरंजीव भव सुपरमँऽऽऽऽऽन
चिरंजीव भव ...सुपरमँऽऽऽऽऽन
सुपरमँन सुपरमँन सुपरमँन, जय हनुमान
सुपरमँन सुपरमँन सुपरमँन, जय हनुमान

स्वर- संदीप खरे
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- अग्गोबाई ढग्गोबाई

मुंगीबाय मुंगीबाय

मुंगीबाय मुंगीबाय
पीट पीट पीट पीट पीट पीट पीट पीट
पीट पीट पीट पीट पीट पीट पीट पीट
जाता कुठे असता कुठे
आणि खरे तर नसता कुठे
इकडून तिकडे नेता काय
खाता काय पिता काय

दारे खिडक्यांच्या खिंडी
बुरजासम तांब्या भांडी
त्यांच्या मागून या सरकत
रांग उतरते बघ घसरत
कसे समजते मुंगीबाय
कोणी ठेवले कोठे काय
कोठे साखर कुठे रवा
कुठे मिठाई कुठे खवा
कुठे कणीक अन् भात कुठे
कुठे जाम अन् केक कुठे
चॉकलेट ही पापलेट ही
जे जे सांडे संपून जाय

विरोधात जर कुणी आले
समजा त्याचे ग्रह फिरले
अशा धावता सर्व मिळून
झन झन झन घेता चावून
तुमच्या बहिणी जरी काळ्या
गरीबासम त्या भोळ्या
तुमचा झेंडा का हो लाल
मला एवढे सांगून जाल
इतके नेऊन करता काय
बिळात सारे भरता काय
कशास साठा करायचा
जन्म धावूनि सरायचा
जरा सोडूनि या ना काम
कामाच्या नानाची टांग
मुंगीबाय येता काय
निवांत थोडे बसता काय

काय काय हे करशी काय
पळण्यावाचून उपाय काय
कधी ना थांबे माझा पाय
अन् बोलाया वेळच नाय
रांगेमध्ये जन्म जरी
मुळी ना आम्ही दीन तरी
जन्म थोडका काम अफाट
म्हणून अविरत चालू वाट
कामाचे हे आम्हा पिसे
कामामध्ये राम दिसे
जग हे जरी मुंगी म्हणते
हत्तीला मी लोळवते
अधिक बोलणे गरजच नाय

मुंगीबाय मुंगीबाय

स्वर- संदीप खरे
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- अग्गोबाई ढग्गोबाई

मी पप्पाचा ढापून फोन

मी पप्पाचा ढापून फोन
फोन केले एकशे दोन
हेलो हेलो बोलतय कोण
हेलो हेलो बोलतय कोण
हेलो बोलतय कोण
ए हेलो

आमचे नाव घेलाशेठ
डोंगराएवढे आमचे पेट
विकत बसतो शाजुक तूप
साला चापून खातो आम्हीच खूप
तुम्ही कोण काय तुमचे नाव
बोला झटपट कुठला गाव
कसले नाव नि कसला गाव
रॉंग नंबर लागला राव

लक्ष्मीबाई मी जोशाघरची
चोरून खाते अंडा बुरजी
वरती कपभर दूध अन् साय
घरात आता कुणी न्हाय
तुम्ही कोण काय तुमचे नाव
बोला झटपट कुठला गाव
कसले नाव नि कसला गाव
रॉंग नंबर लागला राव

मी तर आहे अट्टल चोर
चंद्राची मी चोरून कोर
झालो अंधारात पसार
तारे उरले फक्त हज़ार
तुम्ही कोण काय तुमचे नाव
बोला झटपट कुठला गाव
कसले नाव नि कसला गाव
रॉंग नंबर लागला राव

ढगामधून बोलतोय बाप्पा
चल चल मारू थोड्या गप्पा
बाप्पा बोलतोयस तर मग थांब
सगळ्यात आधी एवढे सांग
कालच होता सांगत पप्पा
तिकडे आलेत आमचे आप्पा
एकतर त्यांना धाडून दे
नाहीतर फोन जोडुन दे
तुला सांगतो अगदी स्पष्ट
अर्धीच राहिलीय आमची गोष्ट
त्यांना म्हणाव येऊन जा
गोष्ट पुरी करून जा
म्हणले होते जाऊ भूर
एकटेच गेले केवढे दूर
डिटेल सगळा सांगतो पत्ता
तिकडे पाठव आमचे आप्पा
बाप्पा…बाप्पा बोला राव
सांगतो माझे नाव अन् गाव
कसले नाव नि कसला गाव
रॉंग नंबर लागला राव

स्वर- संदीप खरे, सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- अग्गोबाई ढग्गोबाई

इल्लू इल्लू पिल्लू

इल्लू इल्लू पिल्लू ग
अजून भलत टिल्लू ग
नाक छोटे तोरा मोठा
गाल रुसून फुल्लू ग

गाल गुबगुब गोरे ग
डोळे लुकलुक तारे ग
हिलवा फ्लॉक लिबिन लाल
कानी निळे झुल्लु ग

चिमने चिमने थिरथिर पाय
घरात राह्यला राजी न्हाय
डोळा चुकवून पळतय हल्लू
पटकन होताय गुल्लू ग

बडबड करणे धंदा ग
पक्का बोबडकांदा ग
हसता कुणी डोळ्यात पाणी
चॉकलेट देता खुल्लू ग

दमदम सारे दमती ग
तरी गमतीने रमती ग
कधी बाबाचा खांदा आणि
कधी आईचा पल्लु ग

स्वर- सलील कुलकर्णी, अंजली कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- अग्गोबाई ढग्गोबाई

दूरदेशी गेला बाबा

दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई
नीज दाटली डोळ्यात, परि घरी कुणी नाही

कसा चिमणासा जीव, कसाबसा रमवला
चार भिंतित धावुन दिसभर दमवला
आता पुरे ! झोप सोन्या' कुणी म्हणतच नाही

कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी ?
कोणी बोलायाला नाही, कशी व्हावी कट्टी-बट्टी ?
खेळ ठेवले मांडून, परि खेळगडी नाही

दिसे खिडकीमधुन जग सारे, दिशा दाही
दार उघडुन तरी तिथे धावायचे नाही
फार वाटे जावे परी, मुठीमध्ये बोट नाही

स्वर- सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- अग्गोबाई ढग्गोबाई

चम्हालातु चंगतोसा

चम्हालातु चंगतोसा चमी चके चष्टगो
मजेत बसा पसरून पाय मुळीच नाही कष्ट गो

चटपटआ चगरन चताहो चथेते चकए चजारा
अवतीभवती लोकच लोक काउन गेला बिचारा
चकडेइ चकलो चकडेति चकलो
बोलून बोलून पुरता थकलो
चरतेपू चरतेपू चमलेद चडबडब चरुनक चठओ

चहीका चलबो चमितो चगळेस चकलो चकतातऐ
मनातल काही बोलायला मुळी जागा उरली नाई
चकतातऐ चहे चकतातऐ चते
जे बोलू ते सर्वा कळते
चजाचीरा चलायचीबो चरतीपू चडलीउ चंबबो

चन्हुनम चधलीशो चनीत्या चकए चाषाभा
सगळे त्या ओळखती आता ही च ची भाषा
चपचुपग चन्हुयाम च
आम्ही भाषा च च च
चमचीआ चमचीतु चम्मतग
चळनारक चाहिना चनालाको

स्वर- संदीप खरे
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- अग्गोबाई ढग्गोबाई

बुंबुंबा

आम्ही राहतो लांब तेथल्या वस्तीहून
पडका वाडा बसला आहे दबा धरून
त्या वाड्याच्या परसामध्ये एक विहीर
दिवसा दिसते साधी भोळी अन् गंभीर
परंतु तेथे जावयास ना कोणा धीर
कारण आहे पक्के ठाऊक आम्हाला
त्या विहिरीतून रहात असतो....बुंबुंबा

ह्रीं ह्रां ह्रीं फट् ॐ फट् स्वाहा
कुजबुजते हिरवे हिरवे जहरी पाणी
उच्चारावे मंत्र अघोरी जसे कुणी
दूर डोंगरामागून तुडवत उघडा माळ
काठावरती येऊन बसते संध्याकाळ
पाण्यावरती पडता छाया सांजेची
दिवसावर हो काळी जादू रात्रीची
घुमघुमणारे गोड पारवे दिवसा जे
विरून जाती रूप धारती घुबडांचे
घुबडांच्या डोळ्यातून मग जळती दिवट्या
तरंगणाऱ्या माडांच्या होती कवट्या
भीतीचा ऊर फाटे असल्या वक्ताला
आळस देतो जागा होऊन.....बुंबुंबा

हिरवे डोळे बुबुळ पांढरे फिरे हिडीस
नाकाजागी केवळ भोके अठ्ठावीस
उडता येते परी आवडे सरपटणे
गाळ चोपडे अंगाला जैसे उटणे
उठल्या उठल्या पहिली त्याला लागे भूक
पिऊन घेतो शेवाळ्याचे हिरवे सूप
अन्य न काही चाले या बुंबुंबाला
भूतेच खातो ताजी ताजी नाश्त्याला
जे जे दिसते त्याची चटणी जोडीला
खा खा खातो पी पी पितो...बुंबुंबा

खोडी काढी खोटे जर बोले कोणी
आणेल कोणी आईच्या डोळा पाणी
चोरी चहाडी दंगा ही जर करी कुणी
बुंबुंबा घेतो बोलावून त्या क्षणी
जवळ घेऊनी कौतुक करतो आणि असे
त्यानंतर तो माणूस कोणाला न दिसे
बुंबुंबाचा डेरा नकळे केंव्हाचा
खापरखापरपणजोबांहून पूर्वीचा
त्यास न भितो असा जगातून कोण भला
बुंबुंबाही घाबरतो बुंबुंबाला
करण्याआधी वाईट काही रे थांबा
दिसेल अथवा आरशातूनी ...बुंबुंबा

स्वर- संदीप खरे, सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- अग्गोबाई ढग्गोबाई

अग्गोबाई ढग्गोबाई

अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
ढग्गाला ऊन्हाची केवढी झळ
थोडी ना थोडकी लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार

वारा वारा गरा गरा सो सो सूम
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम
वीज बाई अशी काही तोरयामध्ये खडी
आकाशाच्या पाठीवर छम छम छडी

खोल खोल जमिनीचे उघडून दार
बूड बूड बेडकाची बडबड फार
डुंबायला डबक्याचा करूया तलाव
साबून बिबून नको थोडा चिक्खल लगाव

स्वर- संदीप खरे, सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- अग्गोबाई ढग्गोबाई