फडकतो झेंडा जरी अजूनही
वेगळेच काही वारा बोलेदूर दिसे मेघ येतो रोडावत
भान हरपत चाललेले
अबोल ओढीचा राखला मी आब
तेणे रक्तदाब खाली वर
असे तुझे नाव गेले देहभर
रक्तात साखर उतरली
असा जिण्यावर उमटला वळ
छातीतून कळ शेवटची
किंवा काय मला हवे आहे हेच
उत्तराची ठेच खाऊ नको
कोण जाणे हेच चलन असेल
ज्या योगे मिळेल हात तुझे
फडकतो झेंडा जरी अजूनही
वेगळेच काही वारा बोले
- संदीप खरे
No comments:
Post a Comment