Friday, June 25, 2010

कुठे ?

कुठलेही हरणे किंवा जिंकणे हे क्षणिक असते
हे समजल्यावरसुद्धा
टिकून राहते का झुंजायची रग ?

प्रतिदिन, प्रतीक्षण स्वत:च स्वत:कडून हरताना
दात विचकत हसण्याचा आवाज येतो
तो कुणाचा ?
मौन पांघरून निरखत राहणे
हे कुठल्याची प्रश्नाचे
उत्तर असु शकते का ?
दिवसा डोईभर ठणका घेऊन
' रात्री शांत झोपतो'
असे म्हणताना चाचरतेच जीभ...ती का ?

रात्री पडणारी स्वप्नेही
' अलिस इन वंडरलॅड' च्या स्वप्नासारखी
निखळ प्रतिभाशाली का नसावीत?
दिवसभरच्या संदर्भात का अडकून पडतात त्यांचे दाते?
घुम्म' आवाजाच्या पार्श्वसंगीतावर
माथाभर वसलेला गोंधळाचा गाव
अजुअनच कल्लोळायला लागतो…

सबूर…सबूर…
जागे होऊ किंवा निजू... कसेही…
काहीतरी करू किंवा
एकेक क्षण हुकवत राहू…कसेही…
देवापुढे दिवा लावू
किंवा ते ही नको…कसेही…

दिवसाच्या कुठल्याही प्रहारात
शहराच्या कुठल्याची चौकात
कधीही आणि केव्हाही
उपलब्ध असण्याचा
कंटाळा येऊ लागला आहे…
…..
अखंड लय साधून रपरपणार्‍या
या चिखली पावसात
ही घाणेरडी शरीरे
कुठे वाळत टाकायची ?

-संदीप खरे

2 comments:

  1. Dear....

    he khup sunder collection ahee..... apratim... tujya hya sangrahabaddal.. tuje shatashaah.. Abhar...

    Suhas Dani
    suhasdani9@gmail.com

    ReplyDelete
  2. Dhanyawaad Suhas...
    blog la niyamitpane bhet det ja...

    ReplyDelete