Tuesday, July 12, 2011

आठवतं तुला ?

आठवतं तुला त्या भेटीत
रिमझिम सरींनी छेडलं होत
भर दुपारी मला जणू
चांदण्याने वेढलं होत

आठवतं तुला त्या भेटीत
श्रावण धुंद बहरला होत
ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने
ओला देह शहारला होत

आठवतं तुला त्या भेटीत
दोघे व्याकुळ झालो होत
तुझा गंध वेचता वेचता
मीही बकुळ झालो होतो

आठवतं तुला त्या भेटीत
भावनांनी कविता रचली होती
माझ्या डोळ्यात तू अन
तुझ्या डोळ्यात मी वाचली होती

आठवतं तुला त्या भेटीत
आणखी काय घडलं होतं ?
मला स्मरत नाही पुढचं
बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं

-संदीप खरे

No comments:

Post a Comment