Saturday, February 18, 2012

राधे, रंग तुझा गोरा

राधे, रंग तुझा गोरा सांग कशाने रापला?
सावळ्याच्या मिठीमध्ये रंग सावळा लागला ?

राधे, कुंतल रेशमी..सैरभैर गं कशाने?
उधळले माधवाने किंवा नुसत्या वारयाने?

राधे, नुरले कशाने तुज वस्त्रांचेही भान?
निळा प्रणय अथवा एका बेभानाचे ध्यान?

राधे, कासाविशी अशी.. तरी 'वेडी' कशी म्हणू ?
तुझ्या रुपाने पाहिली एक वेडीपिशी वेणू !

राधे, दृष्टीतून का ग घन सावळा थिजला?
इथे तुझ्या डोळा पाणी...तिथे मुरारी भिजला !!

डोळा पाणी.. जिणे उन्ह..इंद्रधनुचा सोहळा
पुसटले साती रंग...एक " श्रीरंग " उरला !!

-संदीप खरे

2 comments:

 1. तुमचा ब्लॉग तुम्हाला पैसे देतो का ? मला देतो..एक छदाम सुद्धा न गुंतवता..!!

  अधिक माहितीसाठी हे पहा.

  डिजीटल मराठी वाचनालय

  http://adf.ly/5advF

  ReplyDelete
 2. संग्रह चांगला आहे.
  माझ्या माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत असलेल्या ब्लोग ला विझिट द्यायला विसरू नकोस
  http://themarathi-blog.blogspot.in/

  ReplyDelete