Wednesday, January 20, 2010

आताशा.. असे हे.. मला काय होते

आताशा.. असे हे.. मला काय होते
कुण्या काळचे , पाणी डोळ्यात येते.....
बरा बोलता बोलता , स्तब्ध होतो...
कशी शांतता , शून्य शब्दांत येते.......

कधी दाटू येता , पसारा घनांचा....
कसा सावळा रंग , होतो मनाचा...
असे हालते आत हळूवार काही...
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा....

असा ऐकू येतो , क्षणाचा इशारा ...
क्षणी व्यर्थ होतो दिशांचा पसारा...
नभातून ज्या रोज जातो बुडूनी..
नभाशीच त्या मागू जातो किनारा....

न अंदाज कुठले न अवधान काही....
कुठे जायचे , यायचे भान नाही..
जसा गंध निघतो, हवेच्या प्रवासा
न कुठले नकाशे  न अनुमान काही....

कशी ही अवस्था  कुणाला कळावे..
कुणाला पुसावे कुणी उत्तरावे...
किती खोल जातो, तरी तोल जातो...
असा तोल जाता कुणी सावरावे....

स्वर- सलील कुलकर्णी,संदीप खरे
संगीत - संदीप खरे
गीत - संदीप खरे
अल्बम- आयुष्यावर बोलू काही

No comments:

Post a Comment