Friday, August 13, 2010

मंदी...

मंदीचा काळ...
पसर पसर पसरलेल्या कंटाळवाण्या पिवळट उन्हासारखा
लांबलचक मंदीचा काळ...

चण्याफुटाण्याच्या पैशात बारा बारा चौदा चौदा तास राबवून घ्यावीत
अशा मजबूर मेंढरांचा काळ...
आस्तिकाला नास्तिक आणि नास्तिकाला आस्तिक बनवणारा
काळ्या जादूचा काळ...
उथळांच्या उत्थानाचा, पांडित्यांच्या पतनाचा काळ...
गाणी न सुचण्याचा काळ...कविता न समजण्याचा काळ...
हलकट वातावरणात रोगग्रस्त हवेचा काळ...
पाठीवरल्या कुबडांचा काळ...
हपापलेल्या नजरांसमोर बोलाच्याच कढीभाताचा काळ...
हातापायात लकवा भरण्याचा काळ...
काहीच न कळण्याचा काळ...
आतून आतून उतू जाणार्‍या वांझ शिव्यांचा काळ..
आपण गरीब की श्रीमंत हे न समजण्याचा काळ...
आपण जात्याच की सुपात हे न उमजण्याचा काळ...
वास्तवासमोर वेश्येगत नागडं होऊन जाण्याचा काळ...
खूप खूप कंटाळा येण्याचा काळ...
काहीच न ठरण्याचा काळ...
गार पडत चाललेल्या शिळ्या रक्ताचा काळ...

डबक्यातल्या बेडकांच्या पाठीवरुन
प्रेमाने हात फिरवावा अस वाटण्याचा काळ...
मंदीचा काळ...

-संदीप खरे

4 comments:

 1. अरे मित्रा,
  ही कविता तुला कुठे मिळाली? त्याने कधी सादर केली आणि तू कधी ऐकलीस?
  बाकी तूही संदीपवेडा आहे हे कळाल्याने मला एकदम भरून आलं.
  संदीप-सलील म्हणजे आपली दुखरी जखम... मर्मबंधातली ठेव...
  जे त्यांचे फॅन ते सर्व आपले सोयरे-सांगाती !!!!!!!!

  ReplyDelete
 2. 'नेणीवेची अक्षरे' या काव्यसंग्रहात आहे ही कविता.
  त्यातील कविता वेळ मिळेल तेव्हा पोस्ट करतो आहे.

  ReplyDelete