Sunday, February 7, 2010

येईन स्वप्नात

येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
तुझ्या मनाचं गुलाबी फुल देशील का मला??
सांग तुझ्या मनाचं गुलाबी फुल देशील का मला??

वेड हसण्याची वेड दिसण्याची वेड रुसण्याची ग
वेड्या चंद्राची वेड्या ता-यांची रात्र वेडाची ग
वेड्या प्रश्नाच वेडं उत्तर देशील का मला??
तुझ्या मनाचं गुलाबी फुल देशील का मला??

माझ्या नेत्रात माझ्या गात्रात मनात माझिया
तुझ्या गंधाचा तुझ्या छंदाचा उधाणे पुरिया
तुझ्या भरतीचा चंद्र नवतीचा करशील का मला??
सांग तुझ्या मनाचं गुलाबी फुल देशील का मला??

बघ जरा एकदा , ऐक माझ्या फुला
मौन माझे आता सांगू बघते तुला
तुच स्वप्नातली चंद्रिका साजिरी
तुच सत्यातली मोहिनी लाजरी
अभ्र विरताना रात्र ढळताना येशील का जरा??
कोणी नसताना काही कळताना येशील का जरा??
तुझ्या नावात माझ्या नावाला घेशील का जरा??
सांग तुझ्या मनाचं गुलाबी फुल देशील का मला??

स्वर- संदीप खरे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम- मी गातो एक गाणे

1 comment:

 1. शुभरात्री मित्रहो...
  जाता जाता गोड स्वप्नात जाऊ..
  या काव्य दिंडीचा आनंद व अनुभव अविस्मरणीय होता, या दिंडीची मी पुन्हा आतुरतेने वाट पाहत आहे.
  या काव्यदिंडीचा धुरा मला 'श्री रोहीदास होळे' सरांनी सोपविला होता, आज चौथे पुष्प माझे आवडते श्रेष्ठ कवी संदीप खरे यांच्या कवीतेत गुंफून हा धुरा 'श्री उद्धव कराड' सरांकडे सोपवितो...
  आजच्या तरुण पिढीच्या मनात मराठीला पुन्हा जागा मिळवून देणारे, सोप्या सरळ भाषेत शब्दांवर पकड साधणारे कवी, 'संदिप खरे '.
  गायक, कवी, भाषांतरकार म्हणून त्यांनी खुप नाव कमविले आहे. 'आयुष्यावर बोलू काही' या त्यांच्या प्रयोगाने बरेच विक्रम नोंदविले...
  कधी हे कधी ते, मौनाची भाषांतरे, नेनीविची अक्षरे, तुझ्यावरच्या कविता, आयुष्यावर बोलू काही असे अनेक अल्बम व काव्य संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत....
  .
  *****येईन स्वप्नात*****
  येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
  तुझ्या मनाचं गुलाबी फुल देशील का मला??
  सांग तुझ्या मनाचं गुलाबी फुल देशील का मला??
  .
  वेड हसण्याची वेड दिसण्याची वेड रुसण्याची गं
  वेड्या चंद्राची वेड्या ता-यांची रात्र वेडाची गं
  वेड्या प्रश्नाच वेडं उत्तर देशील का मला??
  तुझ्या मनाचं गुलाबी फुल देशील का मला??
  .
  माझ्या नेत्रात माझ्या गात्रात मनात माझिया
  तुझ्या गंधाचा तुझ्या छंदाचा उधाणे पुरिया
  तुझ्या भरतीचा चंद्र नवतीचा करशील का मला??
  सांग तुझ्या मनाचं गुलाबी फुल देशील का मला??
  .
  बघ जरा एकदा , ऐक माझ्या फुला
  मौन माझे आता सांगू बघते तुला
  तुच स्वप्नातली चंद्रिका साजिरी
  तुच सत्यातली मोहिनी लाजरी
  अभ्र विरताना रात्र ढळताना येशील का जरा??
  कोणी नसताना काही कळताना येशील का जरा??
  .
  तुझ्या नावात माझ्या नावाला घेशील का जरा??
  सांग तुझ्या मनाचं गुलाबी फुल देशील का मला??
  .
  स्वर- संदीप खरे
  संगीत- संदीप खरे
  गीत- संदीप खरे
  अल्बम- मी गातो एक गाणे
  .
  ....रातकवी मनोज भिलारे
  दि. १८.०९.२०१५

  ReplyDelete